You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व प्रजाहित दक्ष राजा

छत्रपती शिवाजी महाराज एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व प्रजाहित दक्ष राजा

– गोवा येथील कार्यक्रमात शिवसेना नेते संदेश पारकर यांचे गौरवोद्गार

एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व प्रजाहित दक्ष राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ५० वर्षांच्या जीवनकाळात देदीप्यमान कार्य केले. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वकीयांमध्ये आत्मसन्मान जागविला. शिवाजी महाराज अद्वितीय योद्धा म्हणून जगभर परिचित आहेत. त्यांनी सर्वप्रथम गनिमी काव्याचा प्रभावी उपयोग केला. प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते, स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते, महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जयजयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे. शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राज्याला माझे कोटी कोटी प्रणाम असे गौरवोद्गार शिवसेना नेते संदेश पारकर यांनी महाराष्ट्र मंडळ गोवा आयोजित शिवजयंती उत्सवावेळी काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्र मंडळ गोवा यांच्यावतीने मिरामार पणजी येथे आयोजित कार्यक्रमांचे उद्घाटन शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.पारकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, सचिव विजय कुडाळकर, विकास पालांडे, मंडळाच्या इतर सदस्यांसह शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =