कंगनाला केंद्रीय गृह मंत्र्यांकडून वाय दर्जाचे संरक्षण
मुंबई प्रतिनिधी
सध्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणावत ला वाय (Y) दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला आहे.
सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्या प्रकरणात कंगनाने बॉलिवूडमधील काही वाईट गोष्टींची माहिती देण्याबाबत तयारी दाखवली. अभिनेता सुशांतच्या मृत्यूची चौकशीची मागणीही तिने केली होती. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी प्रश्नचिन्ह उभे केले होते.त्या तपासादरम्यान काही राजकीय व्यक्ती अडचणीत सापडू नये म्हणून मुंबई पोलिसांवर दबाव टाकला जातो अशी चर्चा सुरू झाली. कंगना च्या या वक्तव्यामुळे खासदार संजय राऊत नाराज झाले होते त्यामुळे शिवसेनेकडून कंगना वर टीका करण्यात आली. शिवसेनेकडून कमळाला मुंबईत पाऊल टाकू देणार नाही अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या मात्र शिवसेनेच्या या वक्तव्यांना न घाबरता कंगना बुधवारी ९ सप्टेंबर ला मुंबईला येत असल्याचे जाहीर केले.
या पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तिच्या संरक्षणाची मागणी केली.
गृहमंत्रालयाने कंगनाला वाय (Y) दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे ११ सुरक्षा रक्षक तीन शिफ्टमध्ये तिला संरक्षण देतील आणि सतत घरच्या दरवाजावर एक रक्षक तैनात राहणार आहे.