You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टर रुजू; तालुक्यातील आरोग्यसेवेला नवे बळ
Oplus_16908288

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टर रुजू; तालुक्यातील आरोग्यसेवेला नवे बळ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर नियुक्त्यांना गती; स्त्रीरोग, शस्त्रक्रिया व त्वचारोग उपचार आता स्थानिक स्तरावर उपलब्ध

कणकवली :

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याने तालुक्यातील आरोग्यसेवेला मोठे बळ मिळाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्यांना गती देण्यात आली असून नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयात डॉ. नेहा बीडकर (एम.एस. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र – जी.एम.सी., मिरज), डॉ. शुभम बोडके (एम.एस. सामान्य शस्त्रक्रिया – जी.एम.सी., औरंगाबाद) आणि डॉ. विश्वजीत मांडे (एम.डी. त्वचारोग – जी.एम.सी., नागपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या तज्ज्ञ डॉक्टरांच्या रुजू होण्यामुळे कणकवली व परिसरातील नागरिकांना स्त्रीरोग, शस्त्रक्रिया तसेच त्वचारोगाशी संबंधित उपचार आता उपजिल्हा रुग्णालयातच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे उपजिल्हा रुग्णालयाला तज्ज्ञ डॉक्टरांची साथ लाभली असून यामुळे तालुक्यातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होईल, अशी भावना उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा