महिला व बालविकास विभागातर्फे सावंतवाडीत बेटी बचाओ बेटी पढाओ बाईक रॅली
सावंतवाडी
दिनांक 09 मार्च 2026 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत अभय केंद्र सावंतवाडी या कार्यालयातर्फे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..ज्यामध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती.सदर कार्यक्रमास नगरपरिषदच्या महिला बालकल्याण सभापती श्रीमती दिपाली भालेकर मॅडम,तालुका संरक्षण अधिकारी श्री. पुरुषोत्तम पाटील सर, सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या पीएसआय श्रीमती माधुरी मुळीक मॅडम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडीच्या श्रीम.घाडीगावकर मॅडम व श्रीम.पाटील मॅडम,सावंतवाडी पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस, सावंतवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा महिला व बालविकास सिंधुदुर्ग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर रॅली ही ‘बेटी बचाओ बेटी पढावो’ या थीमवर आधारित असून सावंतवाडी पोलीस स्टेशनपासून नगरपरिषद सावंतवाडी पर्यंत अशी रॅली काढण्यात आली होती..
