​सिंधू आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत ​​​माणगावमध्ये उद्या हळद खरेदीचा शुभारंभ

​सिंधू आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत ​​​माणगावमध्ये उद्या हळद खरेदीचा शुभारंभ

आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

कुडाळ​:​

सिंधु आत्मनिर्भर अभियान सिंधुदुर्ग, डाॅ. हेडगेवार प्रकल्प आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हळद खरेदी शुभारंभ उद्या आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती माणगाव येथे होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७५ टन हळदीची खरेदी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तथा सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांची आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राजू राऊळ, भाई सावंत, मोहन सावंत, बंड्या सावंत, दीपक नारकर, चारुदत्त देसाई, दादा साईल, सचिन धुरी, श्रावण धुरी, अमित परब आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना अतुल काळसेकर म्हणाले की, मागील वर्षी २५ हजार किलो हळदीच्या बियाण्याचे वाटप केले होते. तर २ हजार ५०० बचतगटांना या बियाण्याचे वाटप करण्यात आले असून ७५ टन हळदीची खरेदी होणार आहे. या हळद विक्रीतून प्रती टन सुमारे १० हजार रूपये असा विक्रमी भाव मिळणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा