जिल्हा लॉकडाऊनमध्ये जाण्याची पाळी आणू नका:जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगल कार्यालये,धार्मिक कार्यक्रमासह देवस्थान व पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे 50 पेक्षा कमी व्यक्तीचा सहभाग , मास्क,सॅनिटायझर सुविधांचा वापर होतो की नाही याची कसून तपासणी केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली व सर्वानी नियम पाळा जिल्हा लॉकडाऊन मध्ये जायची पाळी आणू नका असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण,डॉ श्रीपाद पाटील,डॉ संदेश कांबळे उपस्थित होते