*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित मोठा अभंग*
*तुका झालासे कळस*
*तुकारामबीज*
*दिशाहीन जना…..*
दिशाहीन होते जन
तुकोबांची शिकवण….
द्रष्टे संत तुकाराम
भक्ती केली ती निष्काम…
परखड दिले ज्ञान
खणून काढी अज्ञान…
भोंदू जगी फसविती
नवसाने पुत्र होती?….
विठू नाम सदा ओठी
नाठाळासी हाणू काठी….
कर्म तिथे देव जाणा
मुखानेच नाम म्हणा…..
जे कां रंजले गांजले
त्यास आपुले मानले….
वृक्ष वेली मैत्री साची
साद पर्यावरणाची….
गाथा तारी इंद्रायणी
तुकोबांची बोधवाणी….
ठायी करा एकचित्त
भेटतोची भगवंत…
भागवत धर्म वारी
एक सारे वारकरी…
भेदाभेद अमंगळ
सत्संगाची घाली माळ…
संत तुकोबांची वाणी
जीवनात आचरणी…..!!
~~~~~~~~~~~~~~~
*अरुणा दुद्दलवार✍️🙏🏻🌹*
