सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांचं राज्यपालांनी केलं कौतुक…
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांचं राज्यपालांनी केलं कौतुक…

देशभर कोरोनाचं संकट उभं राहिलेलं असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कार्य करत आहे असे गौरवोद्गार काढत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पालकमंत्र्यांचे कौतुक केले. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी लिहिलेल्या “अद्ययावत आणि स्वच्छही” या लेखाचीही राज्यपालांनी दखल घेत कौतुक केलं.

कोरोनाच्या संकटाच्या काळात राज्यातील सर्वच विभाग धैर्याने या संकटाला सामोरे जाताना दिसत आहेत. राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग सुद्धा शिक्षणाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. अतिशय नियोजनपूर्वक पूढील येणाऱ्या काळाचा विचार करून विस्कटलेली शिक्षणाची घडी पुन्हा बसविण्याचे आव्हान घेऊन हा विभाग सुरू करण्यासाठी अभ्यास करत समर्थपणे कार्यरत आहे. या सर्व घडामोडींवर मंत्री उदय सामंत हे बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

उदय सामंत यांनी मंत्रीपदाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विध्यार्थी व युवकांशी ते वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्यामुळे तरुण वर्ग शिक्षणाच्या ज्या समस्या कोरोनामुळे उभ्या राहिलेल्या आहेत त्यामुळे अस्वस्थ न होता आशाभूत आहेत. १४ एप्रिलच्या दै. लोकसत्ता मधील, *उदय सामंत* यांनी लिहिलेला, *”अद्ययावत आणि स्वच्छही”* हा लेख वाचनात येताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तातडीने ना.उदय सामंत यांना फोन करून संवाद साधला. “आपल्या मार्गदर्शनाखाली आपला विभाग उत्तम काम करत आहे. मला याचा अभिमान वाटतो. आपल्यासारखे व्यक्तीमत्व या विभागाला मंत्री म्हणून लाभले आणि मला नक्कीच खात्री आहे. तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे या विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये नक्कीच चांगले बदल होतील. या विभागाच्या उत्कर्षासाठी माझे कुलपती म्हणून नक्कीच तुम्हाला सहकार्य असेल. तुम्ही पण काम करताना जपून करा” ही सूचनाही त्यांनी आवर्जून दिली. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला जेव्हा पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा उदय सामंत हे रत्नागिरीतील असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी किती योगदान देतील असा प्रश्न कित्येकांना पडला होता. परंतु आतापर्यंत उदय सामंत यांनी उत्कृष्ट कार्य करत आपली निवड सार्थ असल्याचं दाखवून दिलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील स्थिती त्यांनी उत्तमप्रकारे हाताळली आहे, प्रशासनावर आपला वचक ठेवला आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन देखील आपली कामगिरी योग्यरीत्या पार पाडत आहेत. तालुकावर अधिकाऱ्यांच्या बैठका घेत, त्यांना योग्य मार्गदर्शन करत प्रत्येक तालुक्याच्या स्थितीचा आढावा घेत अतिशय उत्तमरीत्या परिस्थिती हाताळत सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रती आपली असलेली आस्था आणि जबाबदारी याचं एक आदर्श उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. मूळ जिल्हावासीय असल्याची प्रचिती त्यांनी आपल्या कार्यातून जिल्हावासीयांना दिली आहे. तरुण तडफदार असल्यामुळे मवाळ धोरण न स्वीकारता प्रसंगी कठोर व आक्रमक राहून परिस्थितीला सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती असल्याने प्रशासनावर त्यांनी चांगली पकड ठेवली आहे.

जिल्ह्याला मिळालेल्या पालकमंत्र्यांमध्ये नक्कीच आपल्या कार्यकर्तृत्वाने येत्या काळात उदय सामंत आपली एक वेगळी ओळख निर्माण करतील आणि जिल्ह्याला लवकरच प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातील यात तिळमात्र शंका नाही….!!

प्रतिक्रिया व्यक्त करा