You are currently viewing मैत्रिण पुढे.. नि म्हैस मागे…
Oplus_16908288

मैत्रिण पुढे.. नि म्हैस मागे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 *मैत्रिण पुढे.. नि म्हैस मागे…*

 

मैत्रीणी आम्ही चार होतो, कॅालेज कुमारी

कॅालेज दूर होते तरी पायी पायी वारी

उठूनी पहाटे रोज त्या झुंजुरमुंजुरात

सूर्यही नसे उठलेला उशिराच येई दारी..

 

गप्पाष्टकात आम्ही झरझर पावले ती

रहदारी तुरळक धुके दिसतसे दिगंती

कोणी तो दूधवाला भोंगाच वाजवित

झपझप पावलांना दृष्टीस सरिता अंती..

 

नदीवरून पुल होता भलताच दिसे थोर

तुरळक रहदारी सायकल दामटी पोर

गाई म्हशी नदीत मनसोक्त डुंबतांना

तो पोर धनगराचा तीरावरी बिनघोर…

 

इतक्यात काय झाले? रे हाय आमच्या दैवा

सुसाट सुटली म्हैस पुलावरी पळायला

मैत्रिण एक माझी ती पुढती म्हैस मागे

तरी संकटात आम्हा आले पहा हसायला..

 

ती दौड दोघी जणींची भलतेच हास्य दृश्य

मैत्रिण माझी दमून झालीच गलीतगात्र

त्या गेल्या पुढे निघूनी म्हैस नि ती मैत्रिण

मुरकुंडी आमची हसून चांगले न केले मात्र..

 

करणार काय पण हो ते दृश्यच तसेच होते

आठवता मजला अजून अजूनही हसूच येते

पुढे झाले काय न कळले वर्गात जाऊनी बसलो

जमता पुन्हा तिघी हो, मन, म्हैस,तिला ही बघते..

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा