आरोंदा येथे गांजासह रेनॉल्ड कार जप्त; कोल्हापुरचे दोघे ताब्यात

आरोंदा येथे गांजासह रेनॉल्ड कार जप्त; कोल्हापुरचे दोघे ताब्यात

सावंतवाडी
आरोंदा येथे सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त केला. या प्रकरणी कोल्हापुरच्या दोघांना ताब्यात घेतले. गोव्याहून रेनाॅल्ड डस्टर कारमधून आरोंदा मार्गे कोल्हापूरला रात्री बारा वाजता जात होते. पोलिसांनी आरोंदा दुरक्षेत्र येथे कारची तपासणी केली. त्यात ४३० मिलीग्रॅम गांजा आढळला. ताब्यात घेण्यात आलेल्यांची मुबारक, सलीम अशी नावे आहेत. हवालदार विजय केरकर, माडखोलकर यांनी कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा