You are currently viewing मंत्रालयात नितेश राणे यांची सावंत कुटुंबीयांची भेट; कोकणात आंबा-काजू प्रक्रिया उद्योगांवर चर्चा

मंत्रालयात नितेश राणे यांची सावंत कुटुंबीयांची भेट; कोकणात आंबा-काजू प्रक्रिया उद्योगांवर चर्चा

मंत्रालयात नितेश राणे यांची सावंत कुटुंबीयांची भेट; कोकणात आंबा-काजू प्रक्रिया उद्योगांवर चर्चा

मुंबई :

कोकणातील कृषी व पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी सुरेश सावंत आणि मनोज सावंत यांच्या फॅमिलीने मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली.
या भेटीत काजू, आंबा तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळावे यासाठी आंबा, काजू, पालेभाजी तसेच दुग्ध व्यवसायावर आधारित प्रक्रिया उद्योग कोकणात उभारले जावेत, यासाठीही सकारात्मक चर्चा झाली.
कोकणातील उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळावी, स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि कृषीपूरक उद्योगांना चालना मिळावी यासाठी अशा प्रकल्पांची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याबाबत शासन पातळीवर पुढील कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा