You are currently viewing कवठणी श्री देव काजरोबा देवस्थानचा वार्षिक केळ्यांच्या घडांचा जत्रोत्सव २२ फेब्रुवारीला

कवठणी श्री देव काजरोबा देवस्थानचा वार्षिक केळ्यांच्या घडांचा जत्रोत्सव २२ फेब्रुवारीला

कवठणी
सावंतवाडी तालुक्यातील कवठणी येथील सुप्रसिद्ध श्री देव काजरोबा देवस्थानचा जत्रोत्सव उद्या सोमवार दि.२२ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.
यावर्षी कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जत्रोत्सवास भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन कवठणी देवस्थान समिती कडून करण्यात आले आहे.
यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या जत्रेचे विशेष म्हणजे देवाला केलेले केळीच्या घडांचे नवस यादिवशी फेडले जातात. त्यामुळे या जत्रेला केळीच्या घडांची जत्राही म्हटले जाते. केळीच्या घडांचा लिलावात भाग घेण्यास व बघण्यास येथे मोठी गर्दी होते.त्यानंतर रात्री उशिरा पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + eleven =