You are currently viewing धावत्या आयशर टेम्पोचा टायर फुटल्याने अपघात…

धावत्या आयशर टेम्पोचा टायर फुटल्याने अपघात…

एक गंभीर तर १४ किरकोळ जखमी;जानवली नदिपुलानजीकची घटना

कणकवली

नॅशनल हायवेवर जानवली नदिपुलावरून धावत्या आयशर टेम्पोचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक गंभीर तर अन्य १४ प्रवासी किरकोळ जखमी झालेआहेत. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने कॅटरिंग सर्व्हिस चे कामगार या टेम्पोतून कॅटरिंग सामानासह जात होते. धावत्या टेम्पोचा टायर फुटून हा अपघात घडून टेम्पो रस्त्यावरून खाली कोसळला. अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 13 =