You are currently viewing मराठी भाषा गौरव दिन : पेबल्स सोसायटीत साजरा !

मराठी भाषा गौरव दिन : पेबल्स सोसायटीत साजरा !

बावधन / पुणे :

कवी कुसुमाग्रज जयंती निमित्त साजरा केला जाणारा मराठी भाषा गौरव दिन पेबल्स २ सोसायटीत विद्यार्थी, युवा आणि ज्येष्ठांच्या उपस्थितीत उल्हासात साजरा करण्यात आला.

कुसुमाग्रजांच्या “माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटासी टिळा” ह्या संजीव कुसूरकर ह्यांनी सादर केलेल्या गीताने झालेली कार्यक्रमाची सुरुवात अनेक काव्य रचना, निबंध, मनोगत, गीत गायन अशा विविध उपक्रमांनी सोसायटीच्या सभागृहात दोन तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झालेले सोसायटीतील साहित्यिक श्रीनिवास गडकरी ह्यांनी सर्वांचे स्वागत करून मराठी भाषेचा गौरव तिच्या व्याकरणशुद्ध दृष्टीने झाल्यास अधिक प्रभावी ठरेल असे सांगत कुसुमाग्रजांच्या थोरपणाचे आणि सामाजिक जाणिवेचे महत्त्व सांगितले.

ज्योती कुलकर्णी,रजनी देशपांडे, शिल्पा कुलकर्णी, अंजली राव,तेजस्विनी कुलकर्णी ह्यांनी विविध कविता,आर्या सादर केल्या.विठ्ठल डंभारे ह्यांनी खास ढंगात *तू फक्त लढ म्हण* ही कविता रसग्रहणासह सादर केली. विनायकराव देशपांडे ह्यांनी स्वरचित कविता सादर केली.विद्या बुरांगी,डॉ ए एम देशमुख,अभय दाढकर ह्यांनी आजची मराठीची स्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली.रेणुका कुरुलकर, विपुल डंभारे, माधुरी सुतार ह्यांनी सादर केलेल्या मराठी गाण्यांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली.

मराठी साहित्यासाठी पुरस्कार प्राप्त सरला सोनजे,भाग्यश्री बडवाईक ह्यांचा सत्कार करण्यात आला.तीन शालेय विद्यार्थ्यांनी मराठी प्रेम व्यक्त करणारे निबंध सादर केले.

सोसायटीतील मराठी प्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती.शिरीष मुजुमदार, मुकुंद कुलकर्णी, प्रग्या राठी,दिलीप बंगीनवार ह्यांच्या परिश्रमाने मराठी भाषा गौरव दिन यशस्वी झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा