You are currently viewing फोंडाघाट वैश्य समाज मुख्य ऑफिसमध्ये ३३ वर्षपूर्ती निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न

फोंडाघाट वैश्य समाज मुख्य ऑफिसमध्ये ३३ वर्षपूर्ती निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न

फोंडाघाट वैश्य समाज मुख्य ऑफिसमध्ये ३३ वर्षपूर्ती निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न

फोंडाघाट

फोंडाघाट वैश्य समाज मुख्य कार्यालयाच्या ३३ वर्षपूर्ती निमित आज उत्साहपूर्ण वातावरणात श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. सकाळी विधीवत पूजा पार पडली असून त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
संध्याकाळी आलेल्या सभासद व नागरिकांची विचारपूस करत पतसंस्थेच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विकास अधिकारी प्रसाद पावस्कर यांनी संस्थेच्या ‘स्कीम कर्ज’ योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच संस्थेच्या १४ शाखांचा डोलारा सक्षमपणे सांभाळला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला चेअरमन बाळा वळंजू तसेच माजी चेअरमन दिलीप पारकर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी लवकरच अंतरजिल्हा पातळीवर आणखी ५ नवीन शाखा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. रात्री भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा