You are currently viewing शब्दसूर्य कुसुमाग्रज

शब्दसूर्य कुसुमाग्रज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दसूर्य कुसुमाग्रज*

 

 

कवी वि वा शिरवाडकर

भगिनी ,कुसुमचे अग्रज

घेतली उपाधी स्वतःहून

नाव गाजले कुसुमाग्रज

 

काव्य ,वेडात मराठे वीर —

गाजली कविता चोहीकडे

स्वातंत्र्य मिळण्या देती प्राण

कर्तृत्वाचे वाजती चौघडे

 

 

शब्दसूर्य शिरवाडकर

मराठी साहित्यात अग्रणी

अन्याया विरुद्ध प्रतिकार

रसिक मनातले तन्मणी

 

 

रंगभूमी होता मृतप्राय

विनंती करती भालेराव

सुरू केले नाटक लिहिणे

नट सम्राटाला मिळे भाव

 

 

लिहिल्या चित्रपटाच्या कथा

वृत्तपत्र संपादक काम

सत्याग्रहात होती सामील

मुक्त करण्यास काळाराम

 

झाले बहु होतीलही बहु

यासम होणे कठीण फार

कुसुमाग्रज पुन्हा न होई

व्यक्त करते हाच विचार

 

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा