You are currently viewing मोती तलावाला पुन्हा मिळाले स्वच्छ रूप
Oplus_16908288

मोती तलावाला पुन्हा मिळाले स्वच्छ रूप

प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची तात्काळ कारवाई

तलावात पडलेले झाड हटवून सौंदर्याला दिली नवी झळाळी

सावंतवाडी :

शहराच्या निसर्गसौंदर्याचा अविभाज्य भाग असलेल्या मोती तलाव परिसरात, विशेषतः पॉम्पस हॉटेलसमोर, अनेक वर्षांपासून एक झाड पाण्यात कोसळलेल्या अवस्थेत पडून होते. तलावाच्या काठी बसून विरंगुळा घालवणाऱ्या नागरिकांना या दृश्यामुळे खटकत होते. तलावाच्या नैसर्गिक आणि रम्य वातावरणावर त्याचा परिणाम होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत होती.

ही बाब लक्षात येताच सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी तत्काळ ‘ऑन द स्पॉट’ पाहणी केली. संबंधित विभागाला त्वरित सूचना देत आवश्यक यंत्रणा बोलावण्यात आली आणि तलावात पडलेले झाड बाहेर काढण्यात आले.

मोती तलाव हा सावंतवाडीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन ओळखीचा मानबिंदू आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुबक आणि पर्यटकांसाठी आकर्षक राहावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी दखल घेतल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा