*काव्यप्रेमी महाराष्ट्र समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जोंधळा…*
वरुनाचं उपकार.
समाधानी पावसाळा.
बापाच्या फ़डामंदी
असा झुलतो जोंधळा . . . .
पोटरा उसवला.
तिथं पाखरांचं येणं जाणं.
चोची चिंबिती पाखरे
जोंधळ्याचे दुध दानं. . . . . .
जोंधळ्याला पाणी देता.
चिखलात जाई तोल.
भेगाळलेल्या टाचेमंदी
बिबव्याचं लावी तेल.. . . .
जसी कनसं चिकाळती.
आगठीचा निघे धूरं .
हुरडा खाण्यासाठी
सुटे जिभिला पाझरं . . . .
भेडी कनसं फ़डामंदी.
भल्लरीला आला सुर.
बाप्पाचा आनंदाने
भरून आला ऊरं. . . . .
झाली मळणी कणसांची.
घरं पोत्यांनी भरू आलं.
माऊलीच्या चेहर्यावर.
आनंद ओसांडलं . . . .
भूमिपुत्र वाघ
