You are currently viewing तिलारी–घोडगेवाडी–मोलें–पारगड (नवीन रा.मा. १८७) रस्त्यासाठी मार्च २०२६ अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद करण्याची मागणी

तिलारी–घोडगेवाडी–मोलें–पारगड (नवीन रा.मा. १८७) रस्त्यासाठी मार्च २०२६ अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद करण्याची मागणी

तिलारी–घोडगेवाडी–मोलें–पारगड (नवीन रा.मा. १८७) रस्त्यासाठी मार्च २०२६ अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद करण्याची मागणी

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी–घोडगेवाडी–मोलें–पारगड या (जुना रा.मा. १३१) नवीन रा.मा. १८७ रस्त्याच्या मंजूर कामांसाठी मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय निधीतून सुमारे १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी–घोडगेवाडी–मोलें–पारगड हा मार्ग सूची १९८१–२००१ नुसार रा.मा. १३१ दर्जाचा होता. मात्र सूची २००१–२०२१ मध्ये त्याचा दर्जा बदलून नवीन रा.मा. १८७ असा करण्यात आला आहे. या मार्गाची एकूण लांबी ०/०० ते १७/२०० कि.मी. असून त्यापैकी ०/०० ते १२/४०० कि.मी. लांबीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंधुदुर्ग अंतर्गत सावंतवाडी विभाग व दोडामार्ग उपविभागाच्या अखत्यारीत येतो, तर उर्वरित भाग कोल्हापूर जिल्ह्यातील मिरवेल येथे जोडला जातो.
सदर मार्गाला यापूर्वी राज्य शासनाकडून अर्थसंकल्पीय मंजुरी देण्यात आलेली आहे. हा मार्ग दोडामार्गवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगड किल्ल्याकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा सर्वात जवळचा व महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे.
दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी, तसेच वारंवार होणारी आंदोलने व उपोषणे लक्षात घेता हा मार्ग प्राधान्याने पूर्ण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. रस्ते बांधकामासाठी अंदाजे १० कोटी रुपये आणि सुरुवातीच्या ८०० मीटर खाजगी जमिनीच्या भूसंपादनासाठी सुमारे ५ कोटी रुपये, अशी एकूण १५ कोटी रुपयांची तरतूद मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा