You are currently viewing जयंती महोत्सव

जयंती महोत्सव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जयंती महोत्सव* 

 

त्यांच्या जयंती महोत्सवाला

पंधरा दिवस आधीपासून

सगळे तयारीला लागले

महापुरुषांची जयंती निमित्त

सगळे कामाला लागले

 

जयंती महोत्सव महापुरुषांचा

बॅनर फलक मात्र

स्वघोषित पुढाऱ्यांच्या

नावाने झळकले

 

झेंडे फडकले फेटे झळकले

लेझीम काठी ढोलताशे वाजले

ना पोवाडे ऐकू आले

ना स्फुर्तीगीते गायले

आतातर डीजेच्या तालावर

दारू भांगच्या नशेत

नको त्या गाण्यांवर

तरूणांचे पाय थिरकू लागले

 

जयजयकार झाला

घोषणा झाल्या गर्जना झाल्या

मोठमोठ्या मिरवणूका निघाल्या

महापुरुषांचे गुणगान झाले

एका दिवसाचे सोपस्कार

पार पाडून सारे शहर

मौजमजेत झोपी गेले

 

बॅनर्स फलक फोटो

झेंडे फेटेवाल्यांचे धंदे झाले

ढोलताशे लेझीम काठी

डीजे वाल्यांची चांदी झाली

स्वघोषित पुढाऱ्यांचे

त्यात्या टापूत वर्चस्व झळकले

 

महापुरुषांच्या जयंतीला

गरीबांच्या झोपडीतल्या

अन्नाचा प्रश्न

कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या

आत्महत्येचा प्रश्न

अत्याचार पिडीत महिलांचा प्रश्न

वृद्धाश्रमातील वृद्धांचे प्रश्न

रोजगार बेकारी सारखे

मुलभूत प्रश्न

अनुत्तरित राहिले

सरकारच्या भरवशावर सोडून

महापुरुषांचे स्वघोषीत भक्त

आपआपल्या कामात मग्न झाले

 

ना त्या महापुरुषांचे विचार घेतले

ना आचरण अंगीकारले

तरीही जयंती महोत्सव

उत्साहात साजरे केले

जयंती महोत्सव उत्साहात

साजरे केले…

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा