You are currently viewing कशास खाता भाव तुम्ही
Oplus_16908288

कशास खाता भाव तुम्ही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कशास खाता भाव तुम्ही*

[765]

स्वप्नात आले महाराज रात्री

काढली त्यांनी *खरडपट्टी*

देशासाठी आम्ही कमविले

तुम्ही तर करताय उधळपट्टी

//1//

घेऊन जीएसटी रयतेकडून

फुकटात वाटता साड्याचोळ्या

जनता होईल आळशी स्वार्थी

बंद करा आधी या *पागोळ्या*

//2//

गल्लो गल्ली उभारून पुतळे

कशास करता महसूल *नास*

लाचखोर बसवून मंत्रालयात

कशाला करता फुकट “फार्स”

//3//

सोडून संकल्प पुतळ्यांसाठी

फास घेऊन मरतोय शेतकरी

वाचवा प्राण *बळीराजाचे*

त्याचे जीवावर खाता भाकरी

//4//

खंडणीखोरांना लावून चाप

जरब बसवावी *शासनाची*

टांगून चार दोन फासावरती

आका बकांना जरब तुमची

//5//

काढून माझ्या जन्म यात्रा

कर्तुत्व तुमचे त्यात *कुठे*

आवाज करत ढोलताशांचा

ध्वनिलहरीतून कान *फुटे*

//6//

धर्मा आडून *लपून छपून*

साप फिरतात *स्वराज्यात*

ठेचून काढा वेळीच त्यांना

बदल करतील ते संविधानात

//7//

कसले करता *वाढदिवस*

पुरुषार्थ नाही त्यात काही

मारून दाखवा हिरवे पिवळे

होऊंदे अंगाची त्यांचे लाही

//8//

बांधून पुतळे *जागो जागी*

कबुतरांची करता आणखी सोय

सरहद्दीतून घुसतात परदेशी

करू नका तुम्ही त्यांची गय

//9//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/932323157

प्रतिक्रिया व्यक्त करा