You are currently viewing देवगड तालुक्यात विकासकामांचा खेळखंडोबा?

देवगड तालुक्यात विकासकामांचा खेळखंडोबा?

देवगड तालुक्यात विकासकामांचा खेळखंडोबा?

भाजपा तालुका उपाध्यक्ष गोविंद सावंत यांची ब्लॅकलिस्टची मागणी

देवगड

देवगड तालुक्यातील मुणगे गावातील आडबंदर रस्ता तसेच मुणगे बौद्धवाडी येथील बंधाऱ्याचे काम मागील दीड वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारांकडून कामे रखडल्याचा आरोप करत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे गोविंद सावंत यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री नितेश राणे विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत असतानाही काही निष्क्रिय ठेकेदार अनेक कामे स्वीकारून ती अर्धवट सोडत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मुणगे आडबंदर रस्त्याचे काम गेल्या वर्षी बी.बी.एम.पर्यंत पूर्ण करण्यात आले; मात्र त्यानंतर पुढील कामाबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. तसेच मुणगे बौद्धवाडी येथे पाणी साठवण्यासाठी उभारण्यात येणारा बंधारा आजही अपूर्ण आहे.
संबंधित विभागाने या दोन्ही कामांची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा आठ दिवसांच्या आत कामे पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गोविंद सावंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा