*ज्येष्ठ साहित्यिका, अनुपमा जाधव यांची आपुलकी साहित्य परिवार, संमेलनाध्यक्ष पदी नियुक्ती*
डहाणू :
डहाणू येथील के.एल.पोंदा.हायस्कूलच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, ज्येष्ठ साहित्यिका, कथाकार, पर्यावरण प्रेमी, निवेदिका मा.अनुपमा जाधव यांची आपुलकी साहित्य परिवार. कोकण विभाग पाचवे साहित्य संमेलन २०२६साठी , त्यांना संमेलनाध्यक्ष देण्यात येणार आहे.
अनुपमा जाधव यांचे , समुद्रसंगीत , वहिवाट ,रानझरा,हे काव्यसंग्रह असून , अनुबंध हा कथासंग्रह प्रकाशित आहे.
गीत.. त्यांनी स्वच्छ भारत अभियान प्रबोधन गीत, प्लास्टिक प्रदूषण गीत, व शाळेसाठी गौरव गीत लिहिले आहे.
अनुपमा जाधव यांना, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कार्यासाठी अनेकविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता फुलते कशी!, कथाकथन , नाट्यलेखन, दिग्दर्शन, असे विविध उपक्रम त्या राबवित आहेत. मराठी भाषा, साहित्य लेखनासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, विद्यार्थी छान कविता लेखन करतात.
त्यांचा या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.
तसेच रविवार दिनांक २२फेब्रुवारी हे साहित्य संमेलन हिल टच फार्म हाऊस अँन्ड रिसॉर्ट विजयगड ता.वाडा येथे संपन्न होणार आहे.
या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे मा. डाॅ. हेमंत सावरा खासदार, पालघर लोकसभा,मा.सौ.सीमा गंधे , नगराध्यक्ष,वाडा नगरपंचायत,मा. डाॅ.गिरीश चौधरी अध्यक्ष गावदेवी, हनुमान मंदिर ट्रस्ट कुडूस,मा.नरेश आकटे उपाध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज, आश्रम ट्रस्ट अं भई,मा.श्री.दिनेश पांडे अध्यक्ष श्रीराम सेवा संस्था कुडूस, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर काव्य संमेलनाध्यक्ष पद मा.अनुपमा जाधव, ज्येष्ठ साहित्यिका या भुषवणार आहेत.
साहित्य संस्कृती व कलेच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या आपुलकी साहित्य परिवार यांच्या वतीने कोकण विभागातील साहित्यिक कवी, कवयित्री व साहित्य रसिक यांच्यासाठी पाचवे साहित्य संमेलन २०२६आयोजित करण्यात आले आहे.
हे संमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थापक मा.श्री.सरकारी वकिल साहेब, हिमांशू पाटील, यांचे विशेष योगदान आहे.
सहसंस्थापक मा.श्री.अनंत पांडुरंग पाटील, तर अध्यक्ष मा.श्री.प्रितेश पटेल , कार्याध्यक्ष मा. सौ.मनाली राऊत , सल्लागार मा. सौ.नेहा धारुरकर ,स्वागतो उत्सुक मा. श्री.मछिद्र पष्टे, सहसंस्थापक मा .श्री.महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष मा.श्री.निशांत ठाकूर, उपाध्यक्ष मा.श्री.शशांक राऊत, सचिव मा.श्री.योगेश गोतारणे, हे सर्व विशेष परिश्रम घेत आहेत.
या संमेलनासाठी कविता सादर करण्यासाठी ७३साहित्यिकांनी नोंद केली असून. त्यांना सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
नवोदित कवींना एक चांगले व्यासपीठ प्राप्त झाले असून, या संमेलनामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.
