You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी
व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.नामदेव गवळी, उपप्राचार्य डॉ.मारूती कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे, प्रमुख वक्ते प्रा. सुरेश पाटील व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.राहुल भोसले उपस्थित होते. उपस्थितांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व छ. शिवाजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी अनिकेत कुलकर्णी व संपदा पुजारी या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे
प्रमुख वक्ते इतिहास विभाग प्रा. सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांचे वैश्विक महत्त्व अधोरेखित करीत असतांना शिवजयंती फक्त मिरवणूक नाही तर शिवरायांच्या आदर्शानी स्वतःला आणि समाजाला घडवण्याची प्रतिज्ञा आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भविष्य निर्माण करावे असे आवाहन केले.
शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवरील गाण्यांवर आकर्षक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. तसेच स्पंदन विभागाच्या वतीने भित्ती पत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी य विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.राहुल भोसले यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा