You are currently viewing कोकणच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या वकिल मित्रांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन”!…

कोकणच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या वकिल मित्रांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन”!…

समाजात आपल्या ज्ञानाचा उपयोग करणारी दोन प्रकारची माणसं असतात.एक सकारात्मक ..जे समाजहिताचे असते..आणि दुसरे नकारात्मक. जे समाजाला त्रासदायक असते.
मुंबई उच्चन्यायालयात आपली वकिली करणारे माझे परममित्र आणि मार्गदर्शक,रत्नागिरीचे सुपूत्र अँड.राकेश भाटकर आणि रत्नागिरीच्या सामाजिक आणि विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात फार मोठं नांव आणि योगदान असणारे दुसरे एक वकील मित्र आदरणीय विलास पाटणे ही जोडगोळी आपल्या ज्ञानाचा उपयोग हा जनकल्याणासाठी करत असतात.सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आणि कोकणच्या अनेक प्रलंबित समस्येबाबत जनहित याचिका दाखल करुन प्रश्न मार्गी लावतात.
आठ महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेच्या त्रुटी आणि त्यामुळे कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय आणि मनस्ताप शासन स्तरावर तातडीने दुर व्हावा.कोरोना रुग्णालयात आवश्यक सुविधा मिळाव्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात स्वँब केंद्र व्हावे म्हणून अँड. राकेश भाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती…परिणामी मा.उच्च न्यायालयाने शासनाला आदेश देवून तातडीने रुग्णाना आवश्यक उपचार आणि सुविधा देण्याचे आदेश दिले…नव्हे दोन्ही जिल्ह्यात स्वँब केंद्रही कार्यन्वीत होवून सर्वसामान्याना दिलासा मिळाला.
या निसर्गसंपन्न कोकणच्या शाश्वत विकासासाठी आणि इथल्या साधनसुविधांच्या योग्य विनीयोग व्हावा म्हणून कोकणचे सुपूत्र आदरणीय सुरेशजी प्रभू सातत्याने प्रयत्नशील आहेत.पश्चिम घाटाची जैवविविधता लक्षात घेऊन या जिल्ह्यात औषधी वनस्पती प्रकल्पाला विद्यमान आयुषमंत्री मा.श्रीपादभाऊ यांनी दोडामार्ग तालुक्यात २०१८मध्ये मान्यता दिली.या प्रकल्पामुळे निश्चितच या जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळणार आहे.मात्र राज्यशासन या प्रकल्पाला जागा देण्यासाठी टाळाटाळ करत आहे.२०१८मध्ये मा.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जागेची पहाणी करुन शासनाला अहवालही पाठवलेला आहे.मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही याऊलट मध्यंतरी हा दोडामार्ग मधील प्रकल्प जळगांव येथे नेण्यात यावा अशा मागणी करण्यात आली.आयुष मंत्रालयाने मंजूर केलेला हा प्रकल्प अशा राजकारणात अडकू नये यासाठी आमचे रत्नागिरीचे वकील मित्र श्री विलास पाटणे यांनी अँड. भाटकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती.दिनांक ४फेब्रुवारी रोजी मुंबई उच्चन्यायालयात त्याची सुनावणी झाली.मा.न्यायमूर्ती सय्यद व मा.न्यायमूर्ती जामदार यांच्या खंडपीठाकडे झालेल्या सुनावणीत राज्यशासनाला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.मा.न्यायालयाने या जनहित याचिकेची तातडीने दखल घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या प्रलंबित औषधी वनस्पती प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झालीआहे.
कोकणच्या शाश्वत विकासासाठी आपल्या ज्ञानाचा सकारात्मक ऊपयोग करणाऱ्या माझ्या या वकिल मित्रांना मनःपूर्वक धन्यवाद..
Adv Patne and Adv Bhatkar..
Many many thanks….
…अँड.नकुल पार्सेकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा