You are currently viewing अभंग संपदा ग्रंथाचा देहू गावी प्रकाशन सोहळा संपन्न

अभंग संपदा ग्रंथाचा देहू गावी प्रकाशन सोहळा संपन्न

पुणे :

राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या देहू गावी अभंग संपदेचं प्रकाशन खालील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर प्राचार्य गोविंद बिराजदार, प्राचार्य वेंकट अणिगुंटे, जागतिक लेवलवरचे पाणी संशोधक अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते विलास कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक गुणवंत साहित्यिक सांप्रदायिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन काव्यप्रेमी महाराष्ट्र आणि उत्तरदायित्व एनजिओ फाउंडेशन या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. फाउंडेशनचे विश्वस्त, अध्यक्ष भूमिपुत्र वाघ, सचिव श्रुतीताई डिंबळे, खजिनदार विलास कुलकर्णी सदस्य नागेश गायकवाड, हरिचंद्र ढाकणे यांनी केले. अभंग संपदेतील साहित्यिकांना ट्रॉफी देऊन प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते सन्मानित केले. अभंग संपदेचे संपादक भूमिपुत्र वाघ, सुधाकर झिंगाडे, कमलाकर भोसले यांच्या बौद्धिक परिश्रमातून, सहभागातून प्रकाशन सोहळा दिनांक 17/02/2026 अभंग मंगल कार्यालय गाथा मंदिर रोड देहूगाव. या ठिकाणी संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोबत मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. त्यानंतर अभंग संपदेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी आपले विचार मांडत असताना आपण अभंग संपदेचे प्रकाशन पवित्र देहूगावी केले. अभंग संपदा पावन झाली. खूप आनंद वाटला. योग्य ठिकाणांची निवड केली. त्याबद्दल आयोजकाचे कौतुक केले. सोबत अभंग संपदेचा लोकार्पण सोहळा धाराशिव जिल्ह्यामध्ये व्हावा आणि साहित्यिकांना सन्मानित करता यावं. अभंग रचना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचाव्यात म्हणुन आयोजन करण्यात यावं, अशी त्यांनी भावना व्यक्त केली. यावेळी प्राचार्य वेंकट अणिगुंठे प्राचार्य गोविंद बिराजदार, विलास कुलकर्णी, प्रकाशिका गौरी मॅडम पुणे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भरभरून शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर अभंगवाणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्रातील नामवंत गुणवंतांनी आपल्या अभंग रचना विचारपीठावरून सादर केल्या. त्यानंतर सहभागी सर्व साहित्यिकांना महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ आण्णा तोडकर आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि अभंग संपदा पुस्तकाचा एक संच देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम आयोजन आणि रूपरेषा या संदर्भात कमलाकर भोसले, सुधाकर झिंगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन भूमिपुत्र वाघ यांनी केले तर आभार कमलाकर भोसले यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा