You are currently viewing संप्रदायासोबत सामाजिक बदलाची चळवळ देशभर उभी रहावी – आकांक्षा चौगुले

संप्रदायासोबत सामाजिक बदलाची चळवळ देशभर उभी रहावी – आकांक्षा चौगुले

उमरगा :

संप्रदायासोबत सामाजिक बदलाची चळवळ देशभर उभी राहावे असे विचार आकांक्षा चौगुले यांनी मॉर्निंग वॉकच्या वतीने आयोजित भजन संध्या या कार्यक्रमाच्या सत्कार प्रसंगी त्यानी व्यक्त केले.

मॉर्निंग वॉक च्या वतीने गजानन महाराज मंदिर उमरगा या ठिकाणी भजन संध्या कार्यक्रम संयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला तालुक्यातील नामवंत, गुणवंत, संगीतकार, गीतकार यांना मॉर्निंग वॉकच्या वतीने निमंत्रित करण्यात आलं होतं.कार्यक्रमाच्या प्रसंगी गायक वादक यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. याप्रसंगी धर्म, संस्कृती, शिक्षण हे सातत्याने बदलणारी प्रक्रिया आहे. आणि ती निरंतर चालल्याने समाज एक संघ राहील असे प्रतिपादन आकांक्षा चौगुले यांनी केले.

कार्यक्रमामध्ये दयानंद पाटील, पांडुरंग सुरवसे, एड. इंगळे सर, श्रीमान भागवत फुकटे, प्रो.मुरली जाधव, सुनील माने, अनिरुद्ध बाबळसुरे, पंडित शिंदे सर, सोहम कुंभार यांच्या सुमधुर आवाजातून अभंग संद्या हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरीचा पांडुरंग जणू उमरगा या ठिकाणी अवतरले अशीच अनुभूती येत होती.

कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि सूत्रसंचालन भूमिपुत्र वाघ यांनी केले. तर या कार्यक्रमाला आवर्जून बळी मामा सुरवसे यांना निमंत्रित केलं होतं.

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये इंजिनिअर बाबरे सर, माने गुरुजी, कुमार तळीखेडे, राम पतंगे, गजानन महाराज मंदिर समितीचे सर्व व्यवस्थापक यांचा विशेष सहभाग होता.

कार्यक्रमामध्ये गायन आणि वादन केलेल्या सर्व मान्यवरांचे आकांक्षा चौगुले यांच्या शुभ हस्ते समाज विकास संस्थेच्या वतीने कवयित्री कै सरूबाई डोके यांच्या जातीवरील ओव्या आणि भूमिपुत्र वाघ यांचा आभाळमाया हा काव्यसंग्रह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज विकास संस्थेचे कार्यकर्ते अक्षय कामले यांनी विशेष परिश्रम घेतले. तर आभार एड.इंगळे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा