You are currently viewing सरमळे येथील श्री देव सपतनाथ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
Oplus_16908288

सरमळे येथील श्री देव सपतनाथ मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात

महाशिवरात्रनिमित्त १४ व १५ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी:

दोन वर्षांपूर्वी एका रात्रीत बांधण्यात आलेल्या सरमळे येथील सपतनाथ मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त तसेच महाशिवरात्रनिमित्त शनिवारी १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बांदा – दाणोली या जिल्हा मार्गावरील नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव सपतनाथच्या या उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.यानिमित्त शनिवारी सकाळी ९ वाजता ग्रामदैवत सातेरी भगवती मंदिरातील देवदवतांचे पालखी, तरंग काठीसह सवाद्य मिरवणुकीने सपथनाथ मंदिरामध्ये आगमन, सकाळी १० वाजता गणपती पूजन पुण्याहवाचन, आचार्य वरण, सपतनाथ व परिवार देवतावर अभिषेक व पूजा, सकाळी ११ वाजता वरद शंकर पूजा, अग्नी पूजन, होम हवन, पूर्णाहुती, दुपारी १ वाजता वाजता देवतांची महाआरती त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.

संध्याकाळी ६:३० वाजता बाल गोपाळ मंडळाचे (शेरवाळेवाडी ओटवणे) यांचे भजन, सायंकाळी ७:३० वाजता गोवा येथील घुमट आरती, रात्री ८:३० वाजता सातेरी प्रासादिक मंडळाचे (सातूळी) भजन, रात्री ९:३० वाजता श्री देव रवळनाथ नवतरुण प्रासादिक मंडळ, (ओटवणे) यांचे भजन, रात्री १०:३० वाजतता बावळाट ग्रामस्थ मंडळाचे भजन, रात्री ११:३० वाजता सुधीर दळवी प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ (कवठी) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.

रविवारी दुपारी १२ वाजता सवाद्य पालखी तरंगकाठीसह देवतांचे नजीकच्या तेरेखोल नदी पात्रात तीर्थस्नान, दुपारी १ वाजता उपस्थित सर्व भाविकांना तरंगकाठीसह देवतांचा आशीर्वाद कौल संध्याकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी सातेरी भगवती देवस्थानचे मानकरी, देवस्थान कमिटी आणि सरमळे ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा