सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. दिपाली भालेकर
मुख्याधिकारी व उपनगराध्यक्षांकडून स्वागत
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. दिपाली दिलीप भालेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर तसेच उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी सौ. भालेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सौ. भालेकर या महिला व बालकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेऊन काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. महिला सक्षमीकरण, बालकल्याण आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्या भर देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
