You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून दांडी, देऊळवाडा येथील विकासकामांसाठी १० लाख मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून दांडी, देऊळवाडा येथील विकासकामांसाठी १० लाख मंजूर

मालवण :

 

मालवण वायरी दांडी किनारा येथील मोरेश्वर देवालय येथील हायमास्ट टॉवर उभारणी बाबत भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पाठपूराव्यातून गती मिळाली आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम २०२१-२२ च्या निधीतून या कामाला ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मोरेश्वर देवालयाचा परिसर झळाळणार आहे.

मोरेश्वर ठिकाणाला शिवकालीन महत्व आहे. याठिकाणी हायमास्ट टॉवर बसवण्याची मागणी येथील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्यामार्फत पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम २०२१-२२ च्या निधीतून या कामाला ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल येथील नागरिकांनी ना. राणे, माजी खा. निलेश राणे आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे आभार मानले आहेत.

देऊळवाडा येथील दाभोळकर घर ते मोर्ये घराकडील गटार उभारणी कामालाही ना. राणे यांच्या खासदार निधीतून दीपक पाटकर यांच्या प्रयत्नातून ५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही कामांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते दत्ता सामंत यांचेही सहकार्य लाभल्याची माहिती दीपक पाटकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा