You are currently viewing मालवण-कसाल मार्गावर भीषण अपघात

मालवण-कसाल मार्गावर भीषण अपघात

मालवण-कसाल मार्गावर भीषण अपघात;

दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

मालवण :

मालवण-कसाल मुख्य मार्गावरील कुंभारमाठ येथे आज रात्री पावणे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार कुंभारमाठ परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीसही तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अपघाताचे नेमके कारण काय, तसेच संबंधित चारचाकी वाहन व चालकाबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा