*मा.आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक घेतले श्री भराडी मातेचे दर्शन*
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून भराडी मातेचे दर्शन घेतले.याप्रसंगी वैभव नाईक व स्नेहा नाईक यांनी जत्रोत्सवातील मसुरे-पोईप व आंगणेवाडी शिवसेना शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.तसेच जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून राबविलेल्या मोफत बिसलेरी पाणी वाटप स्टॉलला भेट देऊन पाणी वाटप केले.
