You are currently viewing स्मृतीपालवी

स्मृतीपालवी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित पुस्तक परिचय*

 

*स्मृतीपालवी*

 

३७ वर्षे सिव्हिल इंजिनिअर म्हणून निवृत्त झालेले हल्ली पुण्याला राहत असलेले श्री अनिल हरि देशपांडे ! त्यांची नाशिक निवासी कन्या सौ योगिनी वसंतराव पैठणकर हिने त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त नाशिकलाच त्यांच्या सहस्त्रदर्शनाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला, त्याचवेळी त्यांच्या *”स्मृतीपालवी*”ह्या पुस्तकाचे प्रकाशन करून आपल्या वडिलांना चिरस्मरणात राहील अशी एक अनोखी भेट दिली. लेखक स्वतः अति संवेदनशील आहेत. लिहिणे हा त्यांचा आवडता छंद, जे न देखे रवि ते देखे कवी असं म्हणतात न, ही उक्ती त्यांना पूर्णपणे लागू पडते ..आपल्या सभोवती रोजच कितीतरी घटना घडत असतात, परंतु त्या घटनांवर सुचलेले, जुन्या काही आठवणी शब्दबद्ध केलेले त्यांचे लेख नेहमीच स्थानिक वृत्तपत्रात प्रसारित होत असतात,अशा चौरेचाळीस लेखांचे संकलन ह्या पुस्तकात केलेले आहे. नाशिकच्याच श्री विजय वडूलेकरं यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके केले आहे. तसेच साहित्यसंपदा प्रकाशन, पेण यांनी ते प्रकाशित केलेले आहे..लेखक शांत मनाने जुन्या स्मृतींना उजाळा देत बसलेले आहेत . स्मृतींना एक नवीनच पालवी फुटलेली आहे..

तर शेवटच्या पृष्ठावर लेखकाचा प्रसन्न तृप्त चेहरा वाचकांना बरेच काही सांगून जातो. मुखपृष्ठ व मलपृष्ठ बरेच काही सांगून जाते. प्रस्तावना सौ सलोनी बोरकर( कवयित्री) ह्यांची असून नंतर लेखकाने मोजक्या परंतु अर्थपूर्ण शब्दात आपले मनोगत व्यक्त केले आहे . नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री मदन शिंदे माजीउपमुख्याध्यापक नाशिक, श्री सुनील दाणे, डॉ वीणा मनचंदा, प्रा मधुकर पवार सौ निर्मला देशमुख,डॉ मनीष दास्ताने सौ सुलभा दा स्तान ह्या त्यांच्या मित्रपरिवाराने व त्यांची मुलगी

सौ योगिनी पैठणकर ह्यांनी दिलेल्या शुभेच्छा वाचून लेखकाचा जनसंपर्क किती मोठा आहे हे सहज लक्षात येते. अनुक्रमणिकेत अनुक्रम नसलेले 44 लेख आहेत दृष्ट लागण्यासारखे या संग्रहाला ही जणू मायेची तीट आहे असे वाटावे इतके विविध प्रसंगावर, वस्तूवर आधारित हे सुंदर लेख वाचतांना आनंद होतो.. शुभ कार्याची सुरवात दारासमोर जलसमार्जन करून व्हावी असा पहिला पाऊस हा लेख आपले स्वागत करतो तर सायकल एक मित्र हा लेख लेखकाच्या कोमल भावनाप्रधान मनाचे दर्शन घडवितो, जसजसे मी पुढे वाचत गेले तसे माझ्या लक्षात आले की माणूसकी हरवली, चहा, पत्र अडकविण्याची तार, साबुदाणा खिचडी, आठवणींचा सूर,स्वयंपाकघर,छत्री कॉफ़ी पत्र पेटी , दूपारची झोप,केश कर्तनालयातील खुर्ची इ वर लेखक जेव्हढ्या दमदार पणे सहज लिहितो तेव्हडेच साबुदाण्याची खिचडी, पाऊस कल्हई वाला रातराणी म्हातारपणाची काठी किंवापदार्थांचे स्वभावदर्शन यावर सुद्धा लिहू शकतो.. जीवनाकडे इतक्या डोळसपणे पाहण्याची लेखकाची वृत्ती त्यांच्या निरागस वृत्तीचे दर्शन घडविते…भुतकाळातला सुगंध यात दडलेला आहे.

पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आता पुढील लेखात आपल्याला काय नवीन वाचायला मिळणार ही उत्कंठा मनाला स्वस्थ बसू देत नाही. तसेच लेखांची शब्दमर्यादा सीमित असल्याने वाचण्याचा कंटाळा अजिबात येत नाही

असे हे सर्वांगसुंदर पुस्तक !

, त्यांची कन्या, योगिनी व जावई श्री वसंतराव पैठणकर ह्यांच्या अथक प्रयत्नाने व सौजन्याने वाचकांना जगाकडे पाहण्याचा , लहान लहान वस्तु, घटनांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देईल ह्यात शंका नाही..

त्यांचे अंतर्नाद व काव्यांकूर ही पुस्तके प्रकाशित आहेतच ,

लवकरच श्री अनिल हरि देशपांडेंची पुढील कलाकृती वाचकांसमोर येवो ह्या शुभेच्छा सह—-

 

 

सौ प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा