*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*त्यागमुर्ती रमाई*
माझी माय रमाई
कसं गं जमलं तुला ?
मन मारुन जगणं अन्
शिळी भाकरी ताटाला
मोह माया नाही धरली
नाही दागिन्यांची हाव
अनमोल तुझा दागिना
बाबा साहेब रूपी रावं
दिन दुबळ्याची आई
माया दिली लेकराला
कोंड्याचा मांडा करुनी
घास मुखी भरवला
कपाळाला कुंकू लाल
मंगळसुत्र मानेला
अनमोल हा दागिना
माझ्या रमाई मातेला
पडक्या भिंतीत संसार
नीट नेटका सजला
नाही गर्व अहंकार
हेवा कोणाचा न केला
अर्धांगिनी बाबा साहेबांची
गर्व तिजवर केला
संविधानाचा करविता
शोभे माझ्या रमाईला
*शीला पाटील. चांदवड.*
