You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -१३६ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -१३६ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १३६ वे,

अध्याय – २१ वा, कविता – १० वी

।गण गण गणात बोते । जय गजानन श्री गजानन ।।

_________________________

श्री गजाननांची कार्य-महती । सार कथा असती । भक्तांची जडली भक्ती । या गोष्टी एकविसाव्या अध्यायात ।।१।।

 

स्वामींच्या समाधी बांधकामाला । अनेकांचा हातभार लागला । सर्व भक्तांना आनंद झाला । वर्गणी देतांना ।।२।।

 

दानशूर भक्त जमले । त्यांनी हजारो रुपये दिले । त्यातून भव्य काम झाले । समाधी, नि मठाचे ।।३।।

 

श्रींच्या समाधीपुढे स्वाहाकार । झाले थोर अपार । शतचंडीचे अनुष्ठान कठीण फार । पडले पार निर्विघ्नपणे ।।४।।

 

झाली धर्मकृत्ये कितीतरी । स्वामींच्या समाधी समोरी ।

दृढ भाव स्वामींवरी । शिष्य आणि भक्तांचा ।।५।।

 

संतकवी श्री दासगणुनी ग्रंथ हा लिहिला । स्वामींचा जीवनालेख सांगितला । कार्य-उपदेश कथीला । जन-कल्याणासाठी ।।६।।

 

श्री गजानन स्वामी चरित । जो नियमित वाचेल सत्य ।

त्याचे पुरतील मनोरथ । गजानन कृपेने ।।७।।

 

दशमी,एकादशी,द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला ।

अनुपम भाग्य येईल त्याला । गजानन कृपेने ।।८।।

 

एकदा तरी वर्षातून । घ्यावे गजाननाचे दर्शन । एकदा तरी

पारायण करा । गजानन चरित्राचे ।।९।।

 

हे अध्याय संचार । माना एकवीस दुर्वांकुर ।पारायणरुपे निरंतर । वाहाव्या गजाननासी ।।१०।।

******

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा