You are currently viewing एनएमएमएस परीक्षेत आडवली हायस्कूलचे यश

एनएमएमएस परीक्षेत आडवली हायस्कूलचे यश

मसुरे :

राज्यस्तरीय एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुक्यातील आर. ए. यादव हायस्कूल आडवलीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

या परीक्षेत प्रथम क्रमांक कु. मैथिली कुसाजी राऊळ (खुला गट), द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी हेमंत घाडीगांवकर (खुला गट), तृतीय क्रमांक- कु. रेवती सुनिल लाड (एनटी ब गट), तृतीय क्रमांक- कु. संपदा गोपाळ मेस्त्री (ओ बी सी गट ), चतुर्थ क्रमांक- कु. जागृती अनिल तांडेल ( ओ बी सी गट ) यांनी प्राप्त केला आहे.

सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे मुख्याध्यापक – तुषार सकपाळ, सहाय्यक शिक्षक-संदीप कोळापटे, साईनाथ झाडे, सौ. तृप्ती वारंग, शाळा समिती अध्यक्ष – कमलाकांत कुबल, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई सदस्य अरुण लाड सर्व मुंबई पदाधिकारी व सदस्य, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा