सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी आता खासगी डॉक्टर आलेत पुढे…

सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी आता खासगी डॉक्टर आलेत पुढे…

जयेद्र परुळेकरांची माहीती; कोरोना काळात मोफत सेवा देण्याची तयारी…

सावंतवाडी प्रातिनिधी
कोरोनाच्या काळात जिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर संक्रमित झाल्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी खाजगी डॉक्टरांनी उचलली आहे.त्यासाठी आय.एम.ए संघटनेच्या माध्यमातून हा आजार आटोक्यात येई पर्यत ही मोफत सेवा देण्याची तयारी त्यांच्याकडून दर्शविण्यात आली आहे.याबाबतची माहीती सावंतवाडीतील बालरोग तज्ञ तथा आय.एम.ए संघटनेचे पदाधिकारी डॉ.जयेद्र परुळेकर यांनी दिली असून जिल्ह्यातील लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या सेवेला सुरुवातही करण्यात आली आहे.

सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले या आय.एम.ए संघटनेचे अध्यक्ष डॉ संजय केसरे, कुडाळ येथील प्रसिद्ध फिजिशियन डॉ.जी.की.राणे, कणकवली येथील सर्जन डॉ.विद्याधर तायशेटे या तिघांनी आज जिल्हा रुग्णालयातील दोनशे वीस कोविड रुग्णांसाठी रुग्णसेवा दिली. दररोज जिल्ह्यातील तीन तज्ञ डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयातील कोविड संक्रमित रुग्णांसाठी पुढील अनेक आठवडे/महिने रुग्णसेवा देणार आहेत.सदर रुग्णसेवा ही निःशुल्क असून कुठल्याही प्रकारचे मानधन आय.एम.ए डॉक्टर्स कडून स्वीकारले जाणार नाही. जिल्ह्यातील रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत व या साथरोगामुळे कमीत कमी मॄत्यू व्हावेत या हेतूने जिल्हाधिकारी मॅडम व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आय.एम.ए या डॉक्टर संघटनेच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे.जिल्ह्यातील डॉक्टरांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा