You are currently viewing कळसुली जिल्हा परिषद व ओसरगाव पंचायत समितीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

कळसुली जिल्हा परिषद व ओसरगाव पंचायत समितीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

कळसुली जिल्हा परिषद व ओसरगाव पंचायत समितीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

कणकवली

कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्राची रुपेश आमडोस्कर तसेच ओसरगाव पंचायत समितीतील अधिकृत उमेदवार सौ. चंदना चंद्रहास राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ वागदे येथील श्री उभादेव मंदिरात नारळ वाढवून उत्साहात करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार वैभवजी नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा देत परिवर्तनासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. परिसरात प्रचाराचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा