You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या क्रिडा महोत्सवाला सुरुवात.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या क्रिडा महोत्सवाला सुरुवात.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या क्रिडा महोत्सवाला सुरुवात.

संस्थेचे सहसंचालक अॅड.शामराव सावंत व कार्यकारिणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत यांच्या हस्ते क्रिडामहोत्सवाचे उद्घाटन.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त) चा क्रिडामहोत्सव दिनांक 2 व 3 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे .या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत व संस्थेचे सहसंचालक अॅड. शामराव सावंत यांच्या हस्ते
दिपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल.भारमल, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री सी ए नाईक, समिती सदस्य डॉ. जी एस मर्गज ,डाॅ डी.जी बोर्डे,
महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
डी.एल.भारमल यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले .
मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कब्बडडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
संस्थेचे कार्यकारी सदस्य अॅड शामराव सावंत यांनी क्रीडा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी एस मर्गज यांनी केले तर आभार डॉ. डी जी बोर्डे यांनी मानले.

या क्रिडामहोत्सवामध्ये कब्बड्डी, हाॅलिबाॅल,टेबल टेनीस,चेस,कॅरम,बॅडमिंटन आदी खेळांची स्पर्धा घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा