सर्वांगीण विकासासाठी आर.पी.आय.ला साथ द्या
– महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका सौ.ज्योती रमाकांत जाधव यांचे आवाहन!
दोडामार्ग
माटणे मतदार संघातील जनतेचा खऱ्या अर्थाने शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक व आरोग्यविषयक विकास करायचा असेल तर एकवेळ आर.पी.आय.(आठवले) पक्षाला मतदारांनी साथ द्यायला हवी,असे आवाहन पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग च्या नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव यांनी केले.
सौ.जाधव म्हणाल्या की,आर.पी.आय.(आठवले)पक्षाचे जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे हे माटणे जि.प.सर्वसाधारण मतदार संघातून पक्षाच्या स्वबळावर निवडणूक लढवित आहेत,पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याची ही वेळ आहे,निवडणूक प्रक्रियेत पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उतरलेले आहे,रस्ते,पिण्याचे पाणी,विज,कर्ज सुविधा,शैक्षणिक व आरोग्यविषयक विकासाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणार आहोत,मतदार संघातील प्रत्येक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणार आहोत,असे सौ.जाधव यांनी सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री -मा.नाम.डॉ.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात गेली अनेक वर्षे पक्षाचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यरत आहे,पक्षाचे जिल्हाध्यक्ष-अजितकुमार कदम,कोकण चे सहसचिव-शंकर जाधव(उसपकर),जिल्हा उपाध्यक्ष-ॲड.एस.के.चेंदवणकर,जिल्हा खजिनदार-आनंद पेंडूरकर,जेष्ठ कार्यकर्ते -गुरूदास जाधव,दोडामार्ग तालूका अध्यक्ष-रामदास कांबळे,महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस-सौ.निताली कांबळे,जिल्हा उपाध्यक्षा-सौ.जागृती सासोलकर,जिल्हा सहसचिव-सौ.प्रगती कांबळे,जिल्हा खजिनदार-सौ.समेधा निगुडकर,महिला आघाडी तालूका अध्यक्षा-सौ.सरीता पिळगांवकर,पक्षाचे तालूका कार्याध्यक्ष-प्रेमानंद पाल्येकर,
तालूका उपाध्यक्ष-मनोहर जाधव,नकुल कांबळे यांच्या सहकार्याची साथ उमेदवार- श्री प्रकाश कांबळे यांना असल्याचे सौ.ज्योती जाधव यांनी सांगितले.
