You are currently viewing तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष

तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष

तलाठी पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष

सिंधुदुर्गनगरी

  जिल्‍हाधिकारी कार्यालय यांच्‍या आस्‍थापनेवरील तलाठी पदभरतीसाठी अर्ज केलेल्‍या उमेदवारांच्‍या अडी अडचणी दूर करण्‍यासाठी आणि त्‍यांना मार्गदर्शन करण्‍याकरिता  जिल्‍हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष (हेल्‍प डेस्‍क) 02362-228845 स्‍थापन करण्‍यात येत आहे.  

            महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग यांच्याकडील पत्रानुसार तलाठी (गट-क) संवर्गाची सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रीया पार पाडण्यासाठी शासन स्तरावरुन जाहिरात प्रसिध्दी देण्यात येणार असून, तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता विभागस्तरावर व जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यातबाबत अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक,भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा