You are currently viewing स्वामी दर्शनाचा योग : अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचा सिंधुदुर्गात भक्तिपर्व

स्वामी दर्शनाचा योग : अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचा सिंधुदुर्गात भक्तिपर्व

स्वामी दर्शनाचा योग : अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचा सिंधुदुर्गात भक्तिपर्व

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचा ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान सिंधुदुर्ग धार्मिक दौरा

सिंधुदुर्ग

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री महेशजी (मालक) कल्याणराव इंगळे हे ९ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानचे विश्वस्त, स्वामी सेवेकरी व स्वामीभक्त असे सुमारे शंभर जण सहभागी होणार आहेत.

सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता देवगड तालुक्यातील हडपीड मठ येथे त्यांचे स्वागत होणार असून सकाळी ९ ते १० या वेळेत अल्पोपहाराचा कार्यक्रम आहे.

सकाळी ११.३० वाजता हडपीड मठातून कणकवली येथील श्री भालचंद्र महाराज मठाकडे प्रस्थान होऊन दुपारी १२ ते १ या वेळेत दर्शन व महाप्रसाद होईल.

दुपारी २ वाजता पिंगुळी-कुडाळ येथील सद्गुरू राऊळ महाराज मठ, सायंकाळी ५.३० वाजता माणगाव येथील टेंबेस्वामी महाराज मठ येथे दर्शन व रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मिठ मुंबरी येथील श्री स्वामी समर्थ मठ, सकाळी १० वाजता कुणकेश्वर मंदिर, दुपारी ११ वाजता आचरा येथील रामेश्वर मंदिर आणि दुपारी १२ वाजता वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे दर्शन व महाप्रसाद होणार आहे.

दुपारी ३ वाजता आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी जत्रोत्सवात उपस्थिती व दर्शन घेण्यात येणार आहे.

बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड येथे पूर्ण वेळ विविध धार्मिक कार्यक्रमांना श्री इंगळे उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्यदिन पूजा-अर्चा तसेच वार्षिक सण-उत्सवांची माहिती भाविकांना देण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ, हडपीडचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा