म्हापणमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा शानदार प्रचार शुभारंभ
वेंगुर्ला
शिवसेना ,भाजप, राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीचे म्हापण जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार सौ.यज्ञा देवदत्त साळगावकर व परुळे पंचायत समितीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन दामोदर देसाई यांच्या प्रचाराचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पपू परब व शिवसेना नेते सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री देव वेतोबा,श्री देव आदिनारायण यांस श्रीफळ ठेऊन करण्यात आला. त्यावेळी म्हापण जिल्हा परिषदेचे आणि परुळे पंचायत समितीचे महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच या प्रचार शुभारंभा वेळी वेंगुर्ले भारतीय जनता पार्टीचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पपू वेंगुर्लेकर यांनी परुळे पंचायत समिती मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन देसाई हेच असल्याने कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे यावेळी स्पष्ट केले.
महायुतीचे म्हापण जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार सौ.यज्ञा देवदत्त साळगांवकर आणि परुळे पंचायत समिती मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन देसाई यांच्यासाठी मेहनत करून भरघोस मताधिक्याने निवडणूक द्यावे, असे आवाहन कार्यकर्ते व मतदार यांना केले.
