अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी च्या वतीने कणकवली येथे उद्या शोकसभेचे आयोजन
कणकवली
राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी च्या वतीने सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा अस्थिकलश कणकवलीत आणण्यात येणार आहे
*महाराष्ट्राचे कर्तबगार व सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून कै. अजितदादा पवार ओळखले जात होते. मात्र त्यांच्या अकस्मिक अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे एवढे नुकसान झाले आहे. म्हणूनच अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित रहावे.
