मसुरे जि. प. उमेदवार सौ. क्षमा संदीप हडकर व पं. स. उमेदवार संजय उर्फ छोटू शिवाजी ठाकूर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण :
मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार सौ. क्षमा संदीप हडकर तसेच महायुतीचे मसुरे पंचायत समिती उमेदवार संजय उर्फ छोटू शिवाजी ठाकूर यांच्या वेरली येथील प्रचाराचा शुभारंभ श्रीदेवी सातेरी मंदिरात करण्यात आला.
यावेळी वेरली गावातून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य देण्याचा एकमुखी निर्णय उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थांनी जाहीर केला. या प्रसंगी संजय उर्फ छोटू ठाकूर, वेरली सरपंच धनंजय परब, संदीप हडकर, विभाग प्रमुख संतोष पालव, भाजप ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, दिगंबर परब, पराग खोत, दत्ताराम परब, अशोक परब, लक्ष्मण परब, भागेश परब, ओमकार दुखंडे, नागराज नावेलकर, चंद्रसेन बागवे, यश शिरसाट, ओमकार लाड, सोहम सावंत, रूपेश दुखंडे, रोशन कासले, शरद लाड, मधु वंजारे, प्रसाद खोत, अशोक सांडव, पांडुरंग ठाकूर, राजेंद्र ठाकूर, गुरुदास ठाकूर, ओमकार ठाकूर, संकेत ठाकूर, प्रशांत परब, अनंत भोगले यांच्यासह महायुतीचे वेरली येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचाराच्या शुभारंभा नंतर वेरली गावात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचाराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
