You are currently viewing भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये मिशन आय ए एस तर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर 

भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये मिशन आय ए एस तर्फे ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर 

अमरावती :

स्पर्धा परीक्षेच्या जगतात संपूर्ण भारतात विनामूल्य काम करणाऱ्या व दुसऱ्या वर्गापासून आयएएस या परीक्षेचे केवळ एक रुपया प्रतिदिन इतक्या अल्पशुल्कामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस आणि वलगावच्या श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे येत्या उन्हाळ्यात ग्रीष्मकालीन स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे सात दिवसांचे शिबिर मे महिन्यात अमरावती शहरातील सर्वात भव्य असलेल्या शिकची रिसॉर्ट मध्ये संपन्न होणार आहे. मिशन आयएएस ही भारतामधील प्रतिष्ठीत सेवाभावी संस्था असून गेल्या पंचवीस वर्षांमध्ये या संस्थेने स्पर्धा परीक्षा विषयक विविध उपक्रम आयोजित केले आहेत.

 

या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आय ए एस या संस्थेचे उद्घाटन महाराष्ट्राचे सध्याचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी केले 25 वर्षांपूर्वी केले असून या पंचवीस वर्षात या संस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी 373 आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकारी आलेले आहेत. याशिवाय संस्थेने संपूर्ण भारतात 19 000 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन स्पर्धा परीक्षेच्या जगतात अतुलनीय काम केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्पर्धा परीक्षेचे शिबीर घेणारीर ही भारतातील एकमेव संस्था आहे.

या संस्कार शिबिरासाठी दहा ते वीस हा वयोगट ठरवण्यात आला असून या शिबिरात बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची अल्पदरामध्ये निवास व भोजन व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास ध्यान साधना स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख मुलाखत तंत्र सराव परीक्षा व विविध आयएस आयपीएस सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येते. याशिवाय एक दिवस शैक्षणिक सहल काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मनपा आयुक्त कार्यालय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत असून 2012 साली या शिबिरामध्ये 850 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावर्षी अमरावती जवळील वलगाव येथील श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टने हे शिबीर आयोजित करण्यात सहकार्य केले असून हे शिबीर अमरावती परतवाडा रोडवरील वलगाव बस स्टॅन्ड जवळील सिकची रिसॉर्ट मध्ये होणार आहे. ज्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी मिशन आयएएस च्या सहसंचालिका प्रा. पल्लवी नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9823294326 या क्रमांकावर तर श्री प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर यांच्याशी 7875713975 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आय. ए. एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा