सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार झेवियर फर्नांडिस यांनी ग्रामदैवताचे आशीर्वाद घेत आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात हा प्रचार शुभारंभ पार पडला.
यावेळी बोलताना झेवियर फर्नांडिस यांनी ग्रामस्थांचा विश्वास आणि भक्कम पाठिंबा आपल्या पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक नेते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
