You are currently viewing कोलगाव जि.प. मतदारसंघात मायकल डिसोझा पुन्हा मैदानात
Oplus_16908288

कोलगाव जि.प. मतदारसंघात मायकल डिसोझा पुन्हा मैदानात

‘नारळ’ चिन्हासह प्रचाराचा शुभारंभ

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा पुन्हा एकदा जनतेसमोर उतरले आहेत. या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असून निवडणूक आयोगाकडून त्यांना ‘नारळ’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

प्रचाराची अधिकृत सुरुवात करताना मायकल डिसोझा यांनी कोलगाव ग्रामदेवता श्री देवी सातेरी व श्री देव कलेश्वर यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.

मतदारसंघात मोठे नवचैतन्य निर्माण झाले असून जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचा विश्वास मायकल डिसोझा यांनी व्यक्त केला. लोकांच्या समस्या सोडवणे आणि कोलगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रचाराच्या प्रारंभी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. ‘नारळ’ हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून मायकल डिसोझा यांच्या उमेदवारीमुळे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा