You are currently viewing पालकमंत्री नितेश राणेंची ‘मास्टर स्ट्रोक’ रणनीती; सिंधुदुर्ग जि.प.मध्ये ८ उमेदवार बिनविरोध
Oplus_16908288

पालकमंत्री नितेश राणेंची ‘मास्टर स्ट्रोक’ रणनीती; सिंधुदुर्ग जि.प.मध्ये ८ उमेदवार बिनविरोध

१७ पंचायत समिती सदस्य बिनविरोध; भाजपचे वर्चस्व, शिंदे सेनेचेही खाते उघडले

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या नियोजनबद्ध आणि काटेकोर निवडणूक रणनीतीचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. जिल्हा परिषदेत एकूण ८ उमेदवार बिनविरोध निवडून येत विक्रम नोंदवला गेला असून, पंचायत समित्यांमध्ये १७ सदस्य बिनविरोध ठरले आहेत.

५० सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिवसेना (शिंदे गट)चा १ असा ८ जणांचा बिनविरोध निकाल लागला आहे. तसेच १०० सदस्यांच्या पंचायत समित्यांमध्ये भाजपचे १६ व शिंदे शिवसेनेचा १ सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. जिल्ह्यातील राजकीय समिकरणांमध्ये भाजपचे वर्चस्व ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – बिनविरोध उमेदवार

खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)

बांदा – प्रमोद कामत (भाजप)

जाणवली – रुहिता राजेश तांबे (शिवसेना – भाजप समर्थित कार्यकर्ती)

पडेल – सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)

बापर्डे – अवनी अमोल तेली (भाजप)

पोंगुर्ले – अनुराधा महेश नारकर (भाजप)

किंजवडे-सावी – गंगाराम लोके (भाजप)

कोळपे – प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)

पंचायत समिती – कणकवली (६ बिनविरोध)

वरवडे – सोनू सावंत (भाजप)

नांदगाव – हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)

जाणवली – महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)

बिडवाडी – संजना संतोष राणे (भाजप)

हरकुळ बुद्रुक – दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)

नाटळ – सायली संजय कृपाळ (भाजप)

देवगड पंचायत समिती (६ बिनविरोध)

पडेल – अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)

नाडण – गणेश सदाशिव राणे (भाजप)

बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)

फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)

शिरगाव – शितल सुरेश तावडे (भाजप)

कोटकामते – ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)

इतर तालुक्यांतील बिनविरोध निकाल

वैभववाडी – कोकिसरे : सौ. साधना सुधीर नकाशे (भाजप)

वेंगुर्ले – आसोली : संकेत धुरी (भाजप)

मालवण – अडवली मालडी : सीमा सतीश परुळेकर (भाजप)

सावंतवाडी – शेर्ले : महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग – कोलझर : गणेश प्रसाद गवस (शिवसेना – शिंदे गट)

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या रणनीतीमुळे सर्वाधिक बिनविरोध जागांचा जिल्हास्तरीय विक्रम नोंदवला गेला आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजप व मित्र पक्षांचे मनोबल यामुळे निश्चितच उंचावले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा