You are currently viewing कुडाळ तालुक्यात अर्ज माघारीचा धडाका; बंडखोर–अपक्ष रिंगणाबाहेर
Oplus_16908288

कुडाळ तालुक्यात अर्ज माघारीचा धडाका; बंडखोर–अपक्ष रिंगणाबाहेर

तहसील कार्यालयात गर्दी; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट लढतीचे संकेत

कुडाळ :

निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून, कुडाळ तहसील कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कुडाळ तालुक्यातील अनेक प्रमुख बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत.

प्राप्त माहितीनुसार खालील प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे —

प्राची प्रमोद परब (अपक्ष) – वेताळ बांबर्डे पंचायत समिती

समीर कृष्णा दळवी (अपक्ष) – जिल्हा परिषद

अस्मिता देविदास नाईक (अपक्ष) – नेरूर देऊळवाडा पंचायत समिती

कीर्तीकुमार भास्कर तेरसे (अपक्ष) – वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद

प्रदीप पुरुषोत्तम गावडे (अपक्ष) – वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद

प्रीती प्रकाश देसाई (अपक्ष) – ओरोस जिल्हा परिषद

मयूर कार्तिक परब (अपक्ष) – जिल्हा परिषद

कृष्णा जगन्नाथ आंबेडकर (शिवसेना उबाठा) – कसाल पंचायत समिती

अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांच्या माघारीमुळे कुडाळ तालुक्यातील निवडणुकीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. मतविभागणी टळण्याची शक्यता निर्माण झाली असून, बहुतांश मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट आणि अटीतटीची लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.

अर्ज माघारीसाठी अवघा एक तास शिल्लक राहिल्याने आणखी कोण माघार घेणार, आणखी किती उमेदवार रिंगणाबाहेर पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा